
नाशिक : येत्या शुक्रवारी (ता. ८) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक शहरात विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत आहेत. या पार्श्र्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. त्याचप्रमाणे, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने शहर आयुक्तालय हद्दीत ‘नो फ्लाईंग झोन’ आदेश लागू केले असून, बुधवारपासून (ता. ६) शुक्रवारी (ता. ८) मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही स्वरुपाच्या उड्डाणाला परवानगी नसल्याची अधिसूचना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक जारी केली आहे. (Vigilance in backdrop of Prime Minister visit to impose No Flying Zone order in Commissionerate limits )