
नाशिक : जिल्ह्याभरात घरकामगारांसाठीची योजना पोहोचविताना नोंदणी अर्ज केलेल्या घरकामगारांना पंधरा दिवसांत ओळखपत्र देण्यात येईल, असे आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त विकास माळी यांनी दिले. नाशिक जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटना ‘आयटक’तर्फे गुरुवारी (ता. ३०) नेहरू गार्डन येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी माळी बोलत होते.