
पिंपळगाव वा. (ता. देवळा) : कधी पुरेसे डॉक्टर उपलब्ध नाहीत, औषधांचा साठा संपुष्टात आला, उपचारांसाठी डॉक्टर डोळेझाक करतात, सरकारी रुग्णालयात चांगले उपचार होत नाहीत, अशी नेहमीची ओरड सर्वांकडून होत राहिली आहे; परंतु तब्बल आठ वर्षे कृत्रिम सहाऱ्यावर अवलंबून असलेल्या विनायक शिंदे यांची पायाची शस्त्रक्रिया यशस्वी करीत नाशिक जिल्हा रुग्णालयात कार्यरत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिव्यंग तज्ज्ञांनी अनोखी तत्परता दाखविली आहे.