
Nashik News : तळेगाव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यावश्यक रुग्ण पोहचल्यानंतर तेथे दोन्ही वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याचे उघड झाल्यानंतर येथील भोंगळ कारभाराची दैनिक सकाळने पोलखोल केल्यानंतर दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी बुधवारी (ता. २१) दिंडोरी ग्रामीण रुग्णालय व तळेगाव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देत वैद्यकीय अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. शिवाय, यापुढे आरोग्य सेवा सुधारण्याबाबत तंबी दिली. (visit of Taleigao Health Centre from MP Bhagare )