
नाशिक : राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांसाठी येणाऱ्या प्रमोशनल व सर्व्हे फोनमुळे मतदार कमालीचे वैतागले आहेत. फोनवर विचारले जाणारे प्रश्नांची संख्या इतकी मोठी आहे, की त्याची उत्तरे देताना नागरिकांची दमछाक होते. आपण कुणाला मतदान करणारा आहोत, हे गुपित असते. मात्र तरीही फोनवर सर्रासपणे कुणाला मतदान करणार, यांनाच मतदान करा, तुमची जात काय? वैयक्तिक स्वरूपाच्या प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे. एखादा नागरिक आपल्या कामांमध्ये गडबडीत असतो अथवा गाडीवर असतो आणि अचानक फोन वाजतो. (Voters are fed up with increasing promotional calls and personal questions of election )