नाशिककरांची आज ‘स्वास्थ्यम’कडे उत्साही वाटचाल!

नाशिककरांची आज ‘स्वास्थ्यम’कडे उत्साही वाटचाल!
Published on: 
नाशिककरांची आज ‘स्वास्थ्यम’कडे उत्साही वाटचाल! ‘सकाळ वॉकेथॉन’ ला पन्नाशीपार नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २.५ किलोमीटर चालण्यासह झुंबा, हास्ययोगाची रंगत सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : पहाटेची प्रसन्न वेळ... उत्साहाने घराबाहेर पडलेले पन्नाशीपार नाशिककर... आरोग्याचा मंत्र देत एकत्र चालणारी पावले आणि चेहऱ्यावर दिसणारा आनंद. ज्येष्ठत्व म्हणजे निवांतपणा नव्हे, तर उत्साहाने जगण्याची नवी सुरुवात, हा संदेश देत ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे सलग दुसऱ्या वर्षी ‘वॉक फॉर स्वास्थ्यम’ वॉकेथॉनचे रविवारी (ता. ४) आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी नाशिक शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वयाची पन्नाशी पार केलेल्या नागरिकांसाठी ही वॉकेथॉन नि:शुल्क आहे. ‘सुहाना स्वास्थ्यम’ प्रस्तुत या सकाळ वॉकेथॉनमध्ये २.५ किलोमीटर अंतर चालत पूर्ण केले जाणार आहे. केवळ चालण्यापुरता मर्यादित न राहता सहभागींच्या उत्साहाला उभारी देण्यासाठी झुंबा, हास्ययोग आणि लकी ड्रॉ अशा विविध उपक्रमांचीही मेजवानी असणार आहे. आरोग्य, आनंद आणि सक्रिय जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाबाबत पन्नाशीपार नाशिककरांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे. ‘चला चालूया... निरोगी आणि आनंदी आयुष्याच्या दिशेने!’ या संदेशासह नाशिककरांनी ‘वॉक फॉर स्वास्थ्यम’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रायोजकांचे सहकार्य : प्रा. देवयानी सुहास फरांदे (आमदार, नाशिक मध्य), सोनी पैठणी नाशिक-येवला आणि मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल, नाशिक हे मुख्य प्रायोजक आहेत. ठक्कर्स ग्रुप लिमिटेड व वक्रतुंड हॉस्पिटल पॉवर्ड बाय स्पॉन्सर्ड आहेत. कौशल्या गॅस्ट्रो, लिव्हर ॲन्ड न्यूट्रिशन क्लिनिक, नाशिक, रायते पाटील पॅरालिसिस, रिहॅबिलिटेशन ॲन्ड आयुर्वेदा सेंटर आणि गोदा श्रद्धा फाउंडेशन हे असोसिएट पार्टनर आहेत. सेल्स ॲन्ड मार्केटिंग, वॉटरमेलन फूड्स ॲन्ड ब्रेव्हरेजेस प्रा. लि. ब्रेव्हरेजेस पार्टनर, क्रिएटिव माइंड एंड मीडिया सर्व्हिसेस पीपल पार्टनर, सोनी गिफ्ट प्रायव्हेट लिमिटेड गिफ्ट पार्टनर आणि मातोश्री ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड ट्रॅव्हल पार्टनर म्हणून सहकार्य करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com