
नाशिक : कोरोना महामारीदरम्यान घरपोच औषध पुरविण्यासाठी दिलेल्या विशेष परवानगीचा अवैध ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडून गैरवापर होत आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे परवानगी मागे घ्यावी, अशी मागणी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केली आहे. या संदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास बंदचा इशाराही देण्यात आला आहे.