
PESA Strike : सरकारचे डोके फिरले आहे काय? सर्वोच्च न्यायालयाचे काही एक म्हणणे नसताना आदिवासी भागातील १७ संवर्ग पेसा भरती का थांबवली असा जाब विचारत माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी नाशिक-गुजरात महामार्गावरील घागबारी-उंबरपाडा चेकनाक्यावर सकल आदिवासी बांधवांच्या वतीने बेमुदत चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनामुळे गुजरातकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सरकार चर्चेसाठी बोलावत नाही तोपर्यंत बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. (no retreat unless PESA is implemented )