
नाशिक : महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जलसंपदा विभागाकडे नोंदविलेल्या पाण्याच्या मागणीला जलसंपदा विभागाने धुडकावून लावल्यानंतर महापालिकेने दोन पावले मागे जात तीन वर्षांच्या पाणीपट्टी करारानुसार अनुज्ञेय पाण्यापेक्षा अधिक पाणी वापराच्या बदल्यात अधिकची पाणीपट्टी अदा करण्याची तयारी दर्शविली आहे. त्या व्यतिरिक्त जूनमध्ये पुढील तीन वर्षांसाठी नव्याने पाणीपट्टीचे दर निश्चित केले जाणार आहे.