शहरातील पाणी पुरवठा

शहरातील पाणी पुरवठा
Published on: 
टूडे मेन ------------------ शहरावर २५ टक्के कपातीचे जलसंकट महापालिका सादर करणार नवा प्रस्ताव; ८२५० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : जलसंपदा विभागाने नाशिककरांना पिण्यासाठी ५५०० दशलक्ष घनफूट व बाष्पीभवनाच्या दरासह ६३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे नाशिककरांवर मोठे जलसंकट कोसळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जवळपास २५ टक्के पाणीकपात होण्याची शक्यता आहे. त्यातच सिंहस्थ कुंभमेळा व दुष्काळामुळे स्थलांतरितांची संख्या वाढणार असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून जलसंपदा विभागाकडे पाणी आरक्षणाचा नवा प्रस्ताव सादर केला जाणार असून, त्यात ८२५० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केली जाणार आहे. नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणांची मालकी जलसंपदा विभागाकडे असल्याने दरवर्षी १५ ऑक्टोबर ते ३१ जुलै या कालावधीसाठी धरणांमधील पाणी आरक्षण निश्चित केले जाते. यंदा नाशिककरांना पिण्यासाठी गंगापूर धरणातून ५४४८, मुकणेतून १७०० व दारणेतून २३० अशाप्रकारे एकूण ७३७० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित करण्याची मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे नोंदविली होती. परंतु पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत नाशिककरांना पिण्यासाठी ७३७० दशलक्ष घनफूट ऐवजी बाष्पीभवनासह ६३०० दशलक्ष घनफूट अर्थात प्रत्यक्ष ५५०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण देणे शक्य असल्याचे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने यांनी सांगितले. त्यामुळे दहा टक्के पाणीकपात दिसतं असली तरी बाष्पीभवनाचे पंधरा टक्के लक्षात घेऊन जवळपास २५ टक्के पाणीकपात होणार आहे. परंतु दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पाण्याची मागणी वाढली आहे. सध्या ५८० ऐवजी ६१० दशलक्ष लिटर्स पाणी धरणातून उपसले जात आहे. पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा असल्याने व दुष्काळामुळे ग्रामिण भाग, मराठवाडा व खानदेशातून स्थलांतरित होण्याची शक्यता लक्षात घेऊन जवळपास तीन लाख लोकसंख्या वाढेल. त्यामुळे महापालिकेकडून नव्याने पाण्याची मागणी नोंदविली जाणार आहे. ---------------चौकट करारानुसार पाणी हवे जलसंपदा विभाग व महापालिकेत २००९ मध्ये पाण्याचा करार झाला होता; त्यात जवळपास ७००० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्याचा करार झाला होता. कुंभमेळा व स्थलांतरितांची संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त १२५० दशलक्ष घनफूट पाण्याची नवीन मागणी नोंदविली जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता रविंद्र धारणकर यांनी सांगितले. ------------------ हिवाळ्यातच मागणीत वाढ साधारण प्रतिदिन ५८० दशलक्ष लिटर्स पाण्याचा उपसा धरणांतून होतो. परंतु उन्हाचे चटके आताचं जाणवू लागले आहे तर दुसरीकडे दिवाळी निमित्त पाण्याची मागणी वाढल्याने प्रतिदिन ६१० दशलक्ष लिटर्स पाण्याचा उपसा करावा लागतं आहे. ---------------ग्राफिक्स मूळ मागणीचा आराखडा गंगापूर धरण : ५,४४८ दलघफू मुकणे धरण: १,७०० दलघफू दारणा धरण: २३० दलघफू -- कपातीचे गणित थेट पाणीकपात १०% बाष्पीभवन तोटा: १५% एकूण प्रभावी कपात: २५% -- ७, ३७० दलघफू - मनपाची मूळ मागणी ५,५०० दलघफू - जलसंपदा विभागाने दिलेला प्रत्यक्ष साठा २५ टक्के – शहरावर ओढवणारी संभाव्य पाणीकपात ८,२५० दलघफू - मनपा सादर करणार नवा सुधारित प्रस्ताव ३ लाख - कुंभमेळा व दुष्काळामुळे वाढणारी अपेक्षित लोकसंख्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.