नाशिकमध्ये दिवाळीनंतर पाणीकपातीचा निर्णय

नाशिकमध्ये दिवाळीनंतर पाणीकपातीचा निर्णय
Published on: 
पान एक सेंकड मेन -------------------- नाशिक शहरात दिवाळीनंतर पाणीकपात पालकमंत्र्यांचे संकेत; शहराला यंदा ४७९ दलघफु कमी पाणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २९ : शहराचे वाढते नागरीकरणाच्या पाश्‍र्वभूमीवर नाशिक महापालिकेने २०२६-२७ साठी ७ हजार ३७० दलघफु पाण्याची मागणी केली असताना जलसंपदाने ६ हजार ३१७ दलघफु पाणी आरक्षणाला मान्यता दिली. संभाव्य पाणी टंचाईचे कारण देत जलसंपदा विभागाने मागणीच्या तुलनेत १०५३ दलघफु कमी पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. हे आरक्षण बघता शहरवासीयांना गतवर्षीच्या तुलनेत ४७९ दलघफु पाणी कमी मिळणार आहे. त्यामुळे शहरावर पाणी कपातीचे संकट उभे ठाकले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर दिवाळीनंतर शहरात एक दिवस पाणीकपात लागू करण्यासंदर्भात नियोजन सुरु असल्याचे संकेत पालकमंत्री महाजन यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात गुरुवारी (ता.२९) जिल्ह्याची २०२६-२७ पाणी आरक्षण बैठक पार पडली. पालकमंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत महापौर हिमगौरी आडके, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र गोवर्धने, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नाशिकचे वाढते शहरीकरण बघता शासनाने नाशिकसाठी ७ हजार ६६७ दलघफु पाणी आरक्षणाची मर्यादा ठरवून देण्यात आली. महापालिकेने प्रत्यक्षरित्या ७ हजार ३७० दलघफु पाण्याची मागणी केली. त्यामध्ये गंगापूर समुहातून ५४४०, दारणा २३० व मुकणेतून १७०० दलघफु पाणी आरक्षित करावे असा प्रस्ताव महापालिकेचा होता. मात्र जलसंपदा विभागाने राष्ट्रीय जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचा निकष पुढे करुन एकुण ६ हजार ३१७ दलघफु पाणी मंजूर केले आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी ६ हजार ७९६ दलघफु पाणी मंजूर असताना जलसंपदा विभागाने त्यात यंदा कपात केली आहे. --- सिंहस्थासाठी ६३५ दलघफु स्वतंत्र आरक्षण कुंभमेळ्यात साधुग्राम तसेच येणाऱ्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेत ६३५ दलघफु पाण्याचे स्वतंत्र आकस्मिक आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये गंगापूर धरणातून ६५ तर दारणा धरणातून ५७० दलघफु पाणी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, धरणांमधील उपलब्ध साठा तसेच बाष्पीभवन, गळती व पाण्याचा वापर विचारात घेता ३१ ऑगस्ट २०२७ पर्यत पाणी पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. --- उपाययोजनांवर भर : प्रसाद जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठकीत गंगापूर धरण समुहात सरासरी ९५ टक्के, गिरणा धरण समूहात सुमारे ९८ टक्के तसेच पश्चिमवाहिनी नदीखोऱ्यातील धरणांमध्ये सुमारे ९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच मध्यम व लघु धरणांमध्ये सुमारे ९६ टक्के साठा शिल्लक असून पाण्याचा काटकसरीने वापराबाबत विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. --- महत्वाच्या सूचना -अवैध पाणी उपसा रोखावा -पाणी उपसणारे विद्युत पंप बंद ठेवावे -पाणी बचतीसाठी सामूहिक प्रयत्न करावे -पाणी काटकसरीबाबत जनजागृती करावी -पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सतर्क राहावे -पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या ----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.