

Nashik
esakal
गौरव जोशी
नाशिक: एल निनोच्या प्रभावामुळे यंदाचा मॉन्सून अपेक्षेप्रमाणे बरसलेला नसल्याने नाशिक विभागावर संभाव्य पाणीटंचाईचे सावट अधिक गडद झाले आहे. मॉन्सूनचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपत असतानाही विभागात अपेक्षित पाऊस झालेला नाही. परिणामी, भविष्यातील संकटाची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने उपाययोजनांना वेग दिला असून, धरणांतील उपलब्ध साठा प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.