Nashik Water Crisis: कांद्याच्या आगारात पाणीटंचाईचा कहर; लासलगावमध्ये महिन्यापासून पिण्याचे पाणीच नाही!

ना कुणी वाली ना कुणी नेता घालतो लक्ष, आली विकतचे पाणी घेण्याची वेळ
The ongoing work of repairing the aqueduct, which has been a constant headache for the Sola Village Water Supply Scheme.
The ongoing work of repairing the aqueduct, which has been a constant headache for the Sola Village Water Supply Scheme.esakal

Nashik Water Crisis : येवला- लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील लासलगाव शहरात गेल्या तीस दिवसांपासून पाणीच न आल्याने नागरिक हतबल झाले आहेत.

येवला शहराचे भाग्य बदलले मात्र लासलगावचे काय? पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असताना जीवन प्राधिकरणाच्या आडमुठ्या धोरणामुळे व सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे लासलगावकरांना एक महिन्यापासून पाणीच मिळाले नसल्याने एन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. (Nashik Water Crisis Havoc of water shortage in lasalgaon no drinking water for month)

कांद्यासाठी प्रसिद्ध असलेले लासलगाव शहर आता पाणीटंचाईचे म्हणून ओळखले जात आहे. अंत्यत महत्त्वाच्या या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणीच नाही का? लोकप्रतिनिधी नेमके काय प्रयत्न करतात हाही प्रश्नच आहे.

याबाबत लासलगावची जनता तीव्र संताप व्यक्त करत आहे. लासलगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना ही सतत जलवाहिनी फुटणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे यामुळे लासलगावकर अनेक महिन्यापासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहेत, याचे गांभीर्य कुणालाही नाही.

या योजनेसाठी २० कोटी रुपये तातडीने मंजूर करण्यात आलेही, मात्र वस्तुस्थिती अशी आहे, की या योजनेचे काम अगदीच कासवगतीने सुरू आहे.

लासलगावकराना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे महाराष्ट्रातील अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती असताना लासलगाव मध्ये मात्र एक- एक थेंब पाण्यासाठी नागरीकांना भटकंती करावी लागत आहे.

याचे कुणालाही सोयरसुतक नाही. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून पाण्याचा प्रश्न गंभीर असताना या मतदारसंघाला लाभलेले दोन हेवी वेट केंद्रीय व कॅबिनेट मंत्री असतानाही या योजनेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, हे लासलगावकरांची दुर्दैव म्हणावे का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The ongoing work of repairing the aqueduct, which has been a constant headache for the Sola Village Water Supply Scheme.
Khadakwasla Dam Water : खडकवासला धरणातून विसर्ग बंद; दौंड, इंदापूरसाठी पिण्याचे पाणी सोडण्यास सुरवात

विशेष म्हणजे राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातलेले असताना जिल्ह्याच्या काही भागात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. लासलगाव परिसरात आत्तापर्यंत मोजून १६० मिलिमीटर पाऊस झालेला आहे.

त्यामुळे विहीर व बोअरवेल यांचेही पाणी जवळपास आटल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. किमान लासलगावकरांना टॅंकरने वाढवायचा पुरवठा केल्यास त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तात्पुरता सुटू शकेल.

"मी आमदार असताना युती शासनाच्या काळात ही महत्त्वाकांक्षी पाण्याची योजना सुरू केली होती. त्यानंतर सलग तीन वेळा लासलगावकरांनी निवडून देऊनही लोकप्रतिनिधी हा प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. रेंगाळलेला पाणी प्रश्न कोणतेही कारण न सांगता त्वरित सोडवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."- कल्याणराव पाटील, माजी आमदार, लासलगाव.

"लासलगावसह सोळा गाव पाणीयोजना सुरळीत होण्यासाठी काही दिवसापूर्वी बेमुदत उपोषण तसेच अधिकाऱ्यांना घेरावही घालून पाहिला. सर्व काही करून बघितले, पण सुस्त व निर्ढावलेल्या अधिकारी कुणाच्यातरी सांगण्यावरून दुर्लक्ष करत असतील तर संबंधित अधिकाऱ्यांनी लोकांचा तळतळाट घेऊ नये. शिवसेना स्टाईलने आंदोलनाची वेळ येऊ नये. कामाचा वेग वाढवून लोकांना न्याय द्यावा." - प्रकाश पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष, निफाड.

"मी दिवसभर काबाडकष्ट करून कुटुंबाची उपजीविका करते. भर पावसाळ्यातही २५ ते ३० दिवसापासून पिण्याचे पाणी येत नाही. पर्यायाने आम्हाला पाणी विकत घ्यावे लागते, ते आमच्या परिस्थितीला परवडत नाही. किमान नळाला नाही तर टँकरने तरी पाणीपुरवठा करावा."

- एक त्रस्त महिला, लासलगाव.

The ongoing work of repairing the aqueduct, which has been a constant headache for the Sola Village Water Supply Scheme.
Jalgaon Water Supply : शहरात एक दिवस उशिराने पाणीपुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com