टंचाई कृती आराखडा सरकारकडे

टंचाई कृती आराखडा सरकारकडे
Published on: 
सणासुदीत ७१ हजार नागरिकांना टँकरचे पाणी जिल्हा प्रशासनातर्फे टंचाई कृती आराखडा सरकारकडे सादर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : नोव्हेंबरच्या प्रारंभीच जिल्ह्यातील १०३ गावे आणि वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत संबंधित ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर ओढावली आहे. तब्बल ३७ टँकरच्या माध्यमातून या भागांना पाणीपुरवठा सुरु असून ७१ हजार ७२९ नागरिकांची तहान त्यातून भागविली जात आहे. दरम्यान जिल्ह्यातील टंचाई निवारणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने अंतिम मान्यतेसाठी तो सरकारकडे सादर केला आहे. पावसाने खंड दिल्याने यंदा जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट आहे. त्यातच आता नोव्हेंबरच्या प्रारंभी काही तालुक्यांमध्ये पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. त्यामुळे आनंदपर्व असलेल्या दिवाळीच्या तोंडावर ग्रामीण भागात टँकर सुरु झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ३५ गावे तसेच ६९ वाड्या-वस्त्यांना ३७ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई येवला तालुक्यात भासत आहे. तालुक्यात २७ गावे व ५५ वाड्या-वस्त्या अशा ८२ ठिकाणी २९ टँकरद्वारे ५२ हजार ८६९ नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. याशिवाय चांदवड व देवळा तालुक्यातील प्रत्येकी एका गावासाठी एक टँकर सुरु आहे. तसेच मालेगाव तालुक्यातील ६ गावे व १४ वाड्यांसाठी ६ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. --- १३.८४ कोटींचा आराखडा जिल्ह्यातील संभाव्य टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेने १३ कोटी ८४ लख ४२ हजारांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये ८२२ गावे तसेच १२८४ वाड्या-वस्तांना टंचाईच्या झळा बसण्याची अंदाज आहे. याठिकाणी टँकरने पाणीपुरवठ्यासह विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यात ३५५ टँकर प्रस्तावित करण्यात आले आहे. -------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.