Nashik Water Crises : आदिवासी बांधवांची पाण्यासाठी भटकंती

Water Crises : अनेक निवडणुका झाल्या, पण तालुक्याचा पाणीप्रश्न सुटलाच नाही. तालुक्यातील आदिवासी बांधवांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
Women drawing water from a well.
Women drawing water from a well.esakal

Nashik Water Crises : अनेक निवडणुका झाल्या, पण तालुक्याचा पाणीप्रश्न सुटलाच नाही. तालुक्यातील आदिवासी बांधवांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पावसाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने लवकरच पाणीटंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवणार आहेत. अद्याप तालुक्यात एकाही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही. (Nashik Water Crisis Wandering of tribals for water marathi news)

मात्र, आवळखेड व खैरेवाडी या दोन गावांचे टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाले आहेत. लवकरच या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार आहे. उन्हाळ्याचे दोन महिने गावे व वाड्यांवर भीषण पाणीटंचाई जाणवणार आहे. तालुक्यातील धरणांचे पाणी मुंबई, उत्तर महराष्ट्राबरोबर, भावली धरणातून थेट दोन फूट पाइपलाइन टाकून पाणी जाणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणार की नाही, हा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.

सध्या लोकप्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत गर्क असल्याने पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी त्यांच्या वेळेनुसार कार्यालयात येत असल्याने पंचायत समिती कार्यालयात केवळ हेलपाटे मारण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. सर्वांत जास्त धरणाचा तालुका म्हणून तालुक्याची ओळख आहे. (latest marathi news)

Women drawing water from a well.
Nashik Water Crisis : नांदगावी जनावरांसाठीही टँकरद्वारे पाणीपुरवठा! वाढत्या उन्हामुळे टंचाईग्रस्त गावांचा आकडा वाढतोय

पावसाच्या माहेरघरी पाण्याचा दुष्काळ अद्यापही संपलेला नाही ‘धरणे उशाशी, कोरड घशाशी’, ही म्हण गेल्या कित्येक वर्षांपासून कायमच आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला अद्याप यश आलेले नाही. एकीकडे योजना फक्त कागदावरच राबवल्या की काय, असा प्रश्न आता इगतपुरीकरांना पडला आहे.

''तालुक्यातील ज्या गावचे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव आल्यावर तत्पर त्या गावांना टँकर सुरू केले जाणार आहेत. आवश्यकतेनुसार ज्या ग्रामपंचायतकडून यादी किंवा मागणी आली, की पुरवठा करणार आहे.''-अभिजित बारवकर, तहसीलदार

''फक्त निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधींना आदिवासी जनतेची आठवण येते. मग तुमच्यासाठी ‘हे करू, ते करू’, असे आश्वासन देऊन वेळ मारून नेतात. मात्र, आजपर्यंत आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात भटकंती करावी लागत आहे.''-रावजी वीर, ग्रामस्थ

Women drawing water from a well.
Nashik Water Scarcity : पाण्याअभावी मेंढपाळांचे कुटुंबासह स्थलांतर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com