
नाशिक : गोदावरी नदीच्या पूररेषेत अद्यापही बांधकामे सुरूच आहेत. तसेच, ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमाला प्रशासनाकडून फारसे महत्त्व दिले गेले नसल्याबद्दल जलतज्ज्ञ व ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाचे प्रवर्तक डॉ. राजेंद्र सिंह यांनी बुधवारी (ता. १५) येथे नाराजी व्यक्त केली. या वेळी सिंहस्थापूर्वी गोदावरी नदीला आणखी सुंदर करू, अशी ग्वाही विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.