पान तीन दोन कॉलम
-------------
15099
नाशिक : खडकाळी भागात जेसीबीने पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन फुटून वाया जाताना लाखो लिटर पाणी.
खडकळी चौकात पाइपलाइन
फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक ता.२७: खडकळी चौकात मंगळवारी (ता.२७) जेसीबीने जुने नाशिक परिसराला पाणीपुरवठा करणारी मुख्य वाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. काम करणाऱ्यापूर्वी वाहिन्यासंदर्भात पूर्ण माहिती न घेतल्याने या प्रकार घडला. यामुळे लाखो लीटर वाया गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
मंगळवारी (ता.२७) रोजी खडकाळी परिसरात विविध केबल टाकण्याचे काम सुरू होते. सायंकाळी त्रंबक चौकी समोरील मुख्य रस्त्याचे जेसीबीच्या साह्याने खोदकाम करण्यात आले. जेसीबीचा ड्रिल लागताच जुने नाशिक परिसरात पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन फुटली आणि लाखो लिटर पाणी वाया गेले. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शहरवासीयांना पाण्याची टंचाई भासू नये. यासाठी महापालिकेकडून पाणी कपातीचे नियोजन केले जात आहे. लवकरच पाणी कपात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे मात्र दैनंदिन कुठल्या ना कुठल्या भागात खोदकामादरम्यान पिण्याची पाइपलाइन फुटून अशाप्रकारे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
स्मार्ट सिटी, महापालिका अथवा विद्युत विभागाकडून कुठल्या प्रकारचे रस्ते खोदकाम करत असताना त्याठिकाणाहून पाण्याची पाइपलाइन गेली आहे किंवा याची तपासणी का केली जात नाही. पाण्याच्या पाइपलाइन तपासणी करणारी विशेष यंत्रणा उपलब्ध करून अशा घटनांना आळा घालावा. जेणेकरून पाणी वाया जाण्याची समस्या सुटेल. शिवाय शहरवासीयांना पाणीटंचाईलाही सामोरे जावे लागणार नाही. पाणी कपातही टळण्यास मदत होईल. असेही नागरिकांकडून सांगण्यात आले.