Nashik Water Shortage : दरेगाव, इनामदार भागात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती; महापालिका हद्दीत असूनही लाभ नाही

Water Shortage : येथील दरेगाव भागातील इनामदरा परिसरातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागत आहे.
Women rush to get water at the hand pump in Inamdara area.
Women rush to get water at the hand pump in Inamdara area.esakal

Nashik Water Shortage : येथील दरेगाव भागातील इनामदरा परिसरातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागत आहे. इनामदार येथे दोन वस्त्या गेल्या तीन पिढ्यांपासून राहतात. त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. नाइलाजाने येथील आदिवासींना हातपंपाचे पाणी प्यावे लागते. यातच हातपंपाचे पाणीही आटले असून मिळणारे पाणी गढूळ येत असल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (Citizens wander for water in Daregaon Inamdar area )

सदर भाग महापालिका हद्दीत असूनदेखील त्यांना महापालिका प्रशासनाकडून पाणी पुरवठा केला जात नसल्याने या भागातील आदिवासींवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. २०१२ मध्ये महापालिकेची हद्दवाढ झाली. हद्दवाढीत कलेक्टर पट्टा, सायने, म्हाळदे, सोयगाव, द्याने, दरेगाव आदी गावे महापालिका हद्दीत आली. या गावांना उशिरा का होईना महापालिकेच्या सर्व सोयी सुविधा मिळू लागल्या.

येथील इनामदरा भागात दोन वस्त्यात सुमारे पन्नास घरे आहे. या घरांना महापालिकेतर्फे अद्यापही पाणी मिळत नाही. पाणी नसल्याने त्यांना एक ते दोन किलोमीटर अंतरावर शेतकऱ्यांच्या विहिरीवर जाऊन पाणी आणावे लागते. येथे ट्रॅक्टर चालविणे, शेत मजुरी, प्लास्टिक कारखान्यात काम, दगड फोडणे, वीट भट्टीवर मजुरी करणे आदी कामे करून आदिवासी बांधव आपला उदरनिर्वाह करतात. (latest marathi news)

Women rush to get water at the hand pump in Inamdara area.
Nashik Water Shortage : सोसायट्यांना नकार, खासगी टँकरचा आधार; प्रतिव्यक्ती 135 लिटर पाण्याची

या भागात एक हातपंप आहे. हातपंपाला गेल्या अनेक दिवसांपासून कमी पाणी येते. येणारे पाणी गढूळ असते. नाइलाजाने तेच पाणी आदिवासी बांधवांना प्यावे लाग आहे. पाण्यामुळे अनेकांना आजाराचा सामना करावा लागत आहे. हातपंप जवळच महापालिकेची जलवाहिनी गेली आहे. तसेच महापालिकेतर्फे नवीन नळ जोडणीसाठी पाच हजार तीनशे रुपये घेतले जातात. पुरेसे काम मिळत नसल्याने मजूर कुटुंबीयांकडे ही रक्कम एकत्रित भरता येत नसल्याचे येथील रवींद्र अहिरे, राजू सूर्यवंशी आदींसह परिसरातील नागरिकांनी सांगितले.

''महापालिकेने येथील नागरिकांसाठी गेल्या अनेक वर्षापासून जलवाहिनी टाकली आहे. येथील आदिवासी बांधव नळ जोडणीसाठी पैसे भरत नाही. त्यामुळे त्यांना नळ जोडणी देता येत नाही.''- कैलास बच्छाव, शहर अभियंता, मालेगाव.

''शासनाच्या अनेक योजना आमच्यापर्यंत पोहचत नाही. गरिबीमुळे नळाच्या जोडणीसाठी एकत्रित पाच हजार तीनशे रुपये भरण्यासाठी पैसे नाही. यासाठी महापालिकेने हप्ते ठरवून द्यावेत. पाण्यासाठी दिवसभर वणवण करावी लागते. काम नसल्याने नागरिकांची परिस्थिती बेताची आहे. अन्यथा महापालिकेने सामूहिक नळ काढून द्यावा जेणेकरून पाण्यासाठी वणवण थांबेल.''- अनिता कुवर, स्थानिक रहिवासी

Women rush to get water at the hand pump in Inamdara area.
Nashik Water Shortage : रामेश्‍वरच्या किशोरसागर धरणात ठणठणाट; 32 वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com