Nashik Water Crisis : पाण्याचे दुर्भिक्ष्य, उष्णतेमुळे फळबागा संकटात! डाळिंबाच्या लागवड क्षेत्रात देवळ्यात मोठी घट

Water Crisis : पाण्याचे दुर्भिक्ष्य व प्रचंड उष्मा यामुळे यंदा फळबागांमधून उत्पादन घेणे अवघड होत आहे.
Although the pomegranate garden in Shiwar at Devla is blooming with flowers, only a small amount of flowers remain as the flowers are dying. a banana garden withered due to lack of water.
Although the pomegranate garden in Shiwar at Devla is blooming with flowers, only a small amount of flowers remain as the flowers are dying. a banana garden withered due to lack of water.esakal

देवळा : पाण्याचे दुर्भिक्ष्य व प्रचंड उष्मा यामुळे यंदा फळबागांमधून उत्पादन घेणे अवघड होत आहे. दरवर्षी मृग बहारची तयारी याच दिवसांत करण्याचे नियोजन असते. त्यासाठी पानगळ करत पाणी देणे, फुलांची निगा राखणे यावर लक्ष केंद्रित केले जाते, परंतु यंदा डाळिंब, द्राक्षे, पपई, केळी अशा सर्वच फळबागांना पाणी देण्यास मर्यादा पडत असल्याने फळबाग व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस फळबाग लागवडीचे क्षेत्र कमी कमी होत आहे. (Nashik Water shortage major decline in area under pomegranate cultivation news)

कसमादे भागात पारंपरिक शेतीसोबत फळबागेची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यात खास करून डाळिंब, द्राक्षे, पपई, पेरू यांच्यासह केळीच्या बागाही दिसून येतात. यात डाळिंब बागांचा मृग बहार हा मुख्य बहार समजला जातो. या बागांना पाणी देत बागा फुलवल्या जातात.

पण यंदा पाणी देणे शक्य होत नसल्याने आणि प्रचंड उष्मामुळे फूलगळ देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे डाळिंबाचा मृग बहार दरवर्षीच्या मानाने बहरणार का ? हा मोठा प्रश्न आहे. पपईच्या बागांची अवस्थाही तशीच आहे. पाण्याअभावी पपई, केळी अशा सर्वच बागा सुकू लागल्या आहेत.

देवळा तालुक्याचा विचार केला तर २०१४ मध्ये डाळिंबाचे क्षेत्र ४६४९.२५ हेक्टर होते ते २०१८-१९ मध्ये केवळ १ हजार ७५० हेक्टर राहिले तर यंदा ५५७. ५५ हेक्टर इतकेच आहे. इतर तालुक्यातही डाळिंब बागांची घसरण अशीच आहे. डाळिंबाच्या फळबागा गेल्या पाच-सात वर्षांपासून कधी दुष्काळ तर कधी गारपीट, तेल्या, मर, प्लेग असे रोग तसेच बाजारभावातील घसरण अशा अनेक संकटात सापडल्याने डाळींबापासून मिळणाऱ्या अपेक्षित उत्पादनात मर्यादा पडत गेल्या. यामुळे शेतकऱ्यांनी वैतागून डाळिंबाच्या बागा उपटून काढल्या. आता थोडीफार नवीन लागवड करू लागले असले तरी पाणी नसल्याने टॅंकरने पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (latest marathi news)

Although the pomegranate garden in Shiwar at Devla is blooming with flowers, only a small amount of flowers remain as the flowers are dying. a banana garden withered due to lack of water.
Nashik Water Crisis : नामपूरला पाण्यासाठी नागरिकांची वणवण! शहराला 7 दिवसातून एकदा पाणी

चौकट देवळा तालुक्यातील फळबाग लागवडीचे क्षेत्र :

डाळिंब ५५७.५५ हेक्टर

पपई १.६९ हेक्टर

लिंबू o.८८ हेक्टर

आंबा ३.८५ हेक्टर

नारळ २.३० हेक्टर

पेरू ८.५७ हेक्टर

द्राक्ष ५८.११ हेक्टर

"थोडेफार पाणी देत डाळिंब बागा फुलवण्याचा प्रयत्न शेतकरी करत असले तरी प्रचंड उष्मामुळे फूलगळ होण्याचे प्रमाण जास्त आहे. केळीच्या बागा पाण्याअभावी सोडून देण्याची वेळ आली आहे. टॅंकरने पाणी देत काही जण प्रयत्न करत आहेत."

-हिरामण सावकार, खुंटेवाडी, ता.देवळा

Although the pomegranate garden in Shiwar at Devla is blooming with flowers, only a small amount of flowers remain as the flowers are dying. a banana garden withered due to lack of water.
Water Crisis : उरुळी देवाची मधील विहिरी कोरड्या; पाणी पुरवठ्यात वाढ करावी; नागरिकांची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com