
Nashik Dam Water Storage : गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने विश्रांती घेतली असून, पावसाचा जोर कमी झाल्याने धरणांतील विसर्गही कमी करण्यात आला आहे. गंगापूरमधील विसर्गामुळे गोदावरी नदीची पूरस्थिती काही प्रमाणात कमी झाली आहे. जिल्ह्यातील १७ धरणांमधून विसर्ग कायम असून, १६ धरणांनी नव्वदी पार केल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. गोदावरी, दारणा, पालखेडसह अन्य धरणांमधून विसर्ग केला जात असल्याने नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. (water storage in 16 dams in district is 90 percent )