
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असताना व यंदा दुष्काळाची कुठलीही सुतराम शक्यता नसतानादेखील पाणीपुरवठा विभाग धरणाच्या पोटातील साठा जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी चर खोदण्यासाठी आग्रही आहे. नगरसचिव विभागाने दोन महिन्यापूर्वी केलेला ठराव न दिल्याने परवानगी असल्याचे गृहीत धरून पुढील कारवाई करणार आहे. त्या व्यतिरिक्त अडचण नको म्हणूनदेखील नगरसेवक विभागाला पत्र पाठवून ठराव तातडीने द्यावा, असेदेखील कळविले आहे.