Nashik Weather Update : दिवसभर घामाने लाही-लाही, सायंकाळी रिमझिममुळे दिलासा

Nashik News : गेल्‍या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहात असल्‍याने कमालीचा उकाडा जाणवत होता.
Drizzle
Drizzleesakal

Nashik Weather Update : गेल्‍या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहात असल्‍याने कमालीचा उकाडा जाणवत होता. सोमवारी (ता.१५) दिवसभर शहरवासीयांची उन्हाच्या झळांनी लाही-लाही होत असताना सायंकाळी अवकाळी पावसाच्या रिमझिम सरी बरसल्‍याने उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला. (Nashik Weather Update summer heat day drizzle in evening)

यंदाच्‍या उन्‍हाळ्यात पारा रोज नवीन उच्चांक गाठतो आहे. गेल्‍या महिन्‍यात मार्चपासूनच उन्‍हाची दाहकता जाणवायला लागली होती. प्रखर सूर्यकिरणांमुळे जनजीवन प्रभावित होत असल्‍याची स्‍थिती होती. दुपारी बारापासून चार वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणांवर वर्दळ घटल्‍याचे चित्र शहरात बघायला मिळत होते.

पाऱ्याने चाळिशी गाठलेली असताना घामाने नाशिककर त्रस्त होते. गेल्‍या दोन-तीन दिवसांपासून सातत्‍याने ढगाळ वातावरण राहात असल्‍याने तप्त सुर्यकिरणांपासून दिलासा मिळत असला तरी, उकाड्यात प्रचंड वाढ झालेली होती. (latest marathi news)

Drizzle
Weather Update: मुंबई, ठाण्यासह या भागात उष्णतेची लाट; तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

सोमवारी दिवसभर उकाडा जाणवत असताना, त्‍यापासून बचावासाठी एसी, कूलरचा आधार घ्यावा लागत होता. सायंकाळी सहाच्‍या सुमारास शहरातील बहुतांश भागांमध्ये रिमझिम पावसाच्‍या सरी बरसल्‍या. या अवकाळी पावसामुळे सायंकाळनंतर उकाडा काही प्रमाणात घटण्यास मदत झाली.

पावसाची शक्‍यता कायम..

हवामान खात्‍याच्‍या अंदाजानुसार येत्‍या एक-दोन दिवसांत अवकाळी पावसाची शक्‍यता कायम आहे. शेतकरी वर्गासाठी अवकाळी पाऊस मनस्‍ताप देणारा ठरणारा असून, शहरवासीयांना उकाड्यापासून दिलासा देणारा ठरणार आहे.

Drizzle
Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com