
येवला : ‘तो मावळतोय शेवटी नव्याने उगवण्यासाठी... हाच आशावाद असावा आपलाही जगण्यासाठी... या काव्यपंक्ती स्मरत सरलेले २०२४ हे वर्ष संकटांच्या हिंदोळ्यावर संपले. मात्र नवा दिवस आपला आहे, असा दृढनिश्चय करत नव्या उमेदीने उभे राहण्याचा संकल्प अन् येणाऱ्या संकटांना झुंज देत यशस्वी होऊ या... असा निश्चय बाळगत आज प्रत्येकानेच जुन्या वर्षाला अलविदा करून नव्या वर्षाचे हर्षोल्हासात स्वागत केले.