किमान तापमानात घसरण सुरुच

किमान तापमानात घसरण सुरुच
Published on: 
कार्टून वापरणे ------------- दिवसा कडक ऊन अन रात्री गारवा! किमान तापमान आठवडाभरात आठ अंशांनी घसरण, तुलनेत कमाल तापमानात वाढ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.८ ः रात्रीच्या तापमानात दररोज घट होत असून हिवाळ्याची चाहुल सुरु झाली आहे. रात्री अकरानंतर वातावरणात गारवा जाणवत असून आठवड्याभरात किमान तापमान आठ अंशांनी घसरले आहे. असे असताना कमाल तापमानात मात्र वाढ झाली आहे. त्‍यामुळे दिवसा कडक उन, आणि रात्री गार वाऱ्याची अनुभूती असे संमिश्र वातावरण सध्या आहे. परतीच्‍या पावसाने दडी मारल्‍याने ऑक्‍टोबर हिटचा चटका वाढलेला होता. परंतु आता ऋतुमानात बदल होत असून, थंडीची चाहूल लागली आहे. सोमवारी (ता.२) नाशिकचे किमान तापमान २२ अंशांवर असताना, आठवडाभरात पाऱ्यामध्ये घसरण होऊन रविवारी (ता.८) तापमान १४.२ अंश नोंदविले आहे. अल्‍पावधीत झालेल्‍या घसरणीमुळे आरोग्‍याच्‍या तक्रारी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जाते आहे. --- दीपोत्‍सवात किरकोळ वाढ दीपोत्‍सवात घरोघरी केली जाणारी पणत्‍यांची रोषणाई व आतषबाजीमुळे पुढील दोन दिवस तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. परंतु दिवाळी आटोपल्‍यानंतर लागलीच थंडीमध्ये वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. --- आरोग्‍याच्‍या तक्रारींत वाढ विषम वातावरणामुळे आरोग्‍यविषयक तक्रारींमध्ये वाढ होण्याचा अंदाज वैद्यकीय तज्‍ज्ञांनी वर्तविला आहे. ऋतुमानातील होणारे बदल लक्षात घेता, आहार-विहारातही बदल करताना आरोग्‍य ठणठणीत राखण्याचा सल्‍ला दिला जातो आहे. ---- गतआठवड्यातील तापमान (अंश सेल्सिअस) वार किमान कमाल सोमवार (ता.२) २२ २८.४ मंगळवार (ता.३) १८.३ ३३.३ बुधवार (ता.४) १८.२ ३४ गुरुवार (ता.५) १८.४ ३३.९ शुक्रवार (ता.६) १७.३ ३२.३ शनिवार (ता.७) १५ ३३ रविवार (ता.८) १४.२ ३२.९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.