आजाराने नाशिक रोडच्या
महिलेचा मालेगावला मृत्यू
मालेगाव : नाशिक येथील अर्चना न्यानोबा नाईकनवरे (वय ३६, रा. जेल रोड) यांची बिरोबा साकुरी (ता. मालेगाव) येथे मंगळवारी (ता. २०) दुपारी एकला अचानक तब्येत बिघडली. मुलगा भरत नाईकनवरे याने तिला येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ. निलेश यांनी तपासून तिला मृत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे.
------
कॅम्प परिसरात
तरुणास मारहाण
मालेगाव : येथील कॅम्प भागातील भायगाव रस्त्यावरील दत्त मंदिरासमोर जुन्या भांडणाची कुरापत काढून तरुणास मारहाण करण्याचा प्रकार घडला. केतन उर्फ पंडीत पवार (वय २६, रा. हेरंब गणेश मंदिराजवळ, मालेगाव) या तरुणाला रोशन योगेश सोनवणे व गोकुळ योगेश सोनवणे (सर्व रा. भगतसिंग नगर, कॅम्प) हे गाय घेण्यासाठी मार्केटमध्ये आले होते. त्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून केतन व त्याचा मित्र समाधान लक्ष्मण पवार यास धक्काबुक्की झाली. त्यांचा वाद तेथील लोकांनी मिटवला. त्यानंतर केतन हा केळी व वेफर घेण्यासाठी त्याकडील दुचाकीने गेला असता गोकुळ व योगेश सोनवणे हे दुचाकीवर त्याला गोकुळ व योगेशने मारहाण केली. असे तक्रारीत म्हटले आहे.
-------
शेंदुर्णी परिसरात
तिघांना मारहाण
मालेगाव : शेंदुर्णी (ता. मालेगाव) येथे तलावातील मोटार काढण्यास सांगितल्याचा राग आल्याने चौघांनी तिघांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. उषा वाल्मिक धनवट (वय ३०, रा. नाळे, ता. मालेगाव), पती वाल्मिक धनवट व सासरे मधुकर सिताराम धनवट हे त्यांच्या शेंदुर्णी (ता. मालेगाव) शिवारातील शेतात गेले. तेथे अनिल शंकर शिंदे, अमोल दिलीप शिंदे, दिलीप शंकर शिंदे यांनी उषा यांच्या शेत तलावात टाकलेली पाण्याची मोटार काढण्यास सांगितली. त्याचा राग येवून अनिल, अमोल यांनी मधुकर धनवट यांना हाताचापटीने व दगडाने पोटात मारहाण केली. उषा व वाल्मिक भांडण सोडवण्यासाठी गेले असता दिलीपने मारहाण केली. असे तक्रारीत म्हटले आहे. तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.