

Nashik News : सोनोग्राफी करण्यासाठी बसमधून जाणाऱ्या महिलेला रस्त्यातच प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे बस थांबवून बसमध्येच प्रसूती करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (ता. १३) सकाळच्या सुमारास घडला. माता आणि बालक सुखरूप असून, ते सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. (woman going for sonography gives birth in bus in Surgana Taluka)