

सिन्नर : बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पैलवानाचा खेळ (डोंबारी) करणाऱ्या दांपत्यावर दोडी (ता. सिन्नर) येथे स्थानिक व्यक्तींकडून अत्याचार झाल्याची घटना सोमवारी (ता. ९) घडली. या घटनेत ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. त्यानंतर तिच्या पतीस रात्रीच्या वेळी चौघांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी मंगळवारी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी वावी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, संशयितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.