Women's Day Special: महिलांना प्रवेश असलेली एकमेव दर्गा! नाशिकमधील हजरत सय्यदानी माँजी साहेबा दर्ग्यात दर्शनासाठी गर्दी

Women's Day Special: अनेक दर्गा, मंदिरांमध्ये केवळ पुरुषांना प्रवेश आहे. या उलट शहरातील भद्रकाली परिसरात केवळ महिलांना दर्शनासाठी प्रवेश असलेली राज्यातील एकमेव दर्गा आहे.
Dargah of Hazrat Syedani Manji Saheba.
Dargah of Hazrat Syedani Manji Saheba.esakal
Updated on

Women's Day Special : अनेक दर्गा, मंदिरांमध्ये केवळ पुरुषांना प्रवेश आहे. या उलट शहरातील भद्रकाली परिसरात केवळ महिलांना दर्शनासाठी प्रवेश असलेली राज्यातील एकमेव दर्गा आहे. ‘हजरत सय्यदानी माँजी साहेबा’ यांची ती दर्गा आहे. फुले मार्केट भागात दर्गा असून, याठिकाणी जिल्ह्यातील महिला दर्शनासाठी येतात. भद्रकाली पोलिस ठाण्यास लागून असलेल्या या दर्गाची विशेषत: म्हणजे तेथे केवळ महिलांना प्रवेश आहे. (nashik Women Day Special only dargah where women have access marathi news)

पुरुषांना दर्गाच्या बाहेरून लांबूनच दर्शन घेता येते. केवळ महिलांना प्रवेश असलेली राज्यातील एकमेव दर्गा आहे. दैनंदिन पूजा अर्चा (खिदमत), साफसफाई, फतिहा पठणासह विविध कामे महिला सेवकच करतात. इस्लामिक कालगणनेनुसार उर्दू सफर महिन्याच्या २४ तारखेस येथे संदल शरीफ होतो. (latest marathi news)

Dargah of Hazrat Syedani Manji Saheba.
Womens Day Special : प्रत्‍येक क्षेत्रात कार्यरत स्‍त्रीचा सन्मान आवश्‍यक!

त्यावेळेसही संदल शरीफ अर्पण करण्यापासून ते सर्व पूजाविधी महिलाच करतात. दर गुरुवारी आणि शुक्रवारी शहराच्या विविध भागातील महिलांची दर्शनासाठी गर्दी असते. येथे प्रत्येक मनोकामना पूर्ण होते, अशी महिलांची भावना आहे. मनोकामना पूर्ण झाल्यावर नवसपूर्ती केली जाते. त्यानिमित्ता नियाजाचे (महाप्रसाद) आयोजन महिलाच करतात.

''महिलांना प्रवेश असलेली राज्यातील ही एकमेव दर्गा आहे. संदल शरीफच्या दिवशी राज्यातील महिला दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे सर्वधर्मीय महिलांना याठिकाणी प्रवेश आहे.''-रुकसाना खान, दर्गा सेवक

Dargah of Hazrat Syedani Manji Saheba.
Women's Day Special : कॉलराने कसा घेतला होता मुलींच्या पहिल्या शाळेचा बळी ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.