Women's Day Special : महिलांनी स्वाभिमानी जीवन जगावे! उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे

Women's Day Special : नोकरी करणाऱ्या महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळते ही गोष्ट खरी असली तरी प्रत्येक महिलेने नोकरीच केली पाहिजे असे नाही.
Swati Thavil, Shubhangi Bharde
Swati Thavil, Shubhangi Bhardeesakal

Women's Day Special : नोकरी करणाऱ्या महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळते ही गोष्ट खरी असली तरी प्रत्येक महिलेने नोकरीच केली पाहिजे असे नाही. पण प्रत्येक महिलेने स्वाभिमानी जीवन जगले पाहिजे. त्यासाठी योग्य व्यवसाय करा, नोकरी, काम करून स्वत:च्या पायावर उभे राहिलेच पाहिजे. सर्व करताना कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांनाही योग्य न्याय दिला पाहिजे, अशी प्रांजळ भावना नाशिकच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे व स्वाती थविल यांनी व्यक्त केली. (nashik Women Day Special Deputy Collector Shubhangi Bharde marathi news)

महिला दिनानिमित्त प्रशासनातील महिला अधिकाऱ्यांशी ‘सकाळ’ने संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या, महिलांची उमेद वाढविणाऱ्या आणि त्यांचे आत्मबळ वाढविणाऱ्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात सहा महिला उपजिल्हाधिकारी कार्यरत आहेत. ग्रामीण भागासह आठ महिला तहसीलदार प्रशासनाचा कारभार सांभाळतात.

त्यांच्या प्रतिनिधी म्हणून शुभांगी भारदे व स्वाती थविल यांच्याशी प्रातिनिधिक चर्चा केली. शुभांगी भारदे यांनी आपला प्रशासकीय अनुभव सांगताना म्हणाल्या, कमी वयात आणि पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या प्रज्ञा बडे-मिसाळ यांच्याकडून प्रेरणा घेऊन एमपीएससीचा अभ्यास सुरु केला.

२००१ मध्ये परीक्षा दिली आणि २००२ मध्ये तहसीलदार म्हणून प्रथमत: भडगाव (जि. जळगाव) येथे नियुक्ती मिळाली. कालांतराने धुळे, जळगाव, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. या संपूर्ण कार्यकाळात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संवाद करण्याची वेळ आली. (latest marathi news)

Swati Thavil, Shubhangi Bharde
Womens Day Special : ‘ति’ने जिद्दीने फुलवली सेंद्रिय शेती!

त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. उदभवणाऱ्या समस्यांवर मात करून पुढे कसे जायचे, हे प्रशासनात शिकायला मिळाले. विशेषतः: निवडणूक काळात आलेला अनुभव हा कायमस्वरूपी स्मरणात राहणारा आहे. महिलांनी स्वत:ला कमी न लेखता स्वाभिमानी होऊन जगले पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

उपजिल्हाधिकारी स्वाती थविल म्हणाल्या, ‘एमपीएससी’चा अभ्यास करण्याची प्रेरणा मोठा भाऊ प्रकाश यांच्याकडून घेतली. नाशिकच्या पोलिस वसाहतीमधील ज्ञानवर्धिनी अभ्यासिकेत अभ्यास केला. २००९ मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत दाखल झाले. जळगाव, नंदुरबार, नाशिक अशा विविध जिल्ह्यांत काम करताना वेगवेगळे अनुभव आले.

प्रशासकीय सेवेत दाखल होण्यापूर्वीच आपण कशासाठी येणार आहोत, हे ठरवले पाहिजे. वेगवेगळ्या लोकांशी संवाद कसा ठेवावा. त्यांच्या अडचणी, समस्या सोडविण्याचे काम आपल्या हातून झाले पाहिजे, हे सर्व करताना कौटुंबिक जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. त्याचे योग्य नियोजन केले तर दोन्ही गोष्टींना आपण योग्य न्याय देवू शकतो. तशी तयारी आपण ठेवलीच पाहिजे. तरच प्रशासनात काम करण्याचे समाधान लाभते, असे त्या म्हणाल्या.

Swati Thavil, Shubhangi Bharde
Womens Day Special : प्रत्‍येक क्षेत्रात कार्यरत स्‍त्रीचा सन्मान आवश्‍यक!

जिल्ह्यातील महिला तहसीलदार : वैशाली आव्हाड (कुळ कायदा), सुनीता जऱ्हाड ( जिल्हा करमणूक अधिकारी), मंजूषा घाटगे (सर्वसाधारण), माधुरी आंधळे (संगायो), रचना पवार (संगायो), शोभा पुजारी (नाशिक), श्वेता संचेती (त्र्यंबकेश्वर), आशा गांगुर्डे (पेठ).

भाजीपाला घेण्यास स्वतः जात...

दुसऱ्यावर विसंबून राहू नका आणि कौटुंबिक जबाबदाऱ्याही पार पाडा या दोन्ही अधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार त्यांनी स्वतः याचे कसोशीने पालन केले आहे हे विशेष. श्रीमती भारदे धुळे येथे उपजिल्हाधिकारी असताना त्या अनेकदा दोन्ही लहान मुलांना घेऊन साक्री रस्त्यावरील भाजीबाजारात जात असत.

तेव्हा अनेक महिला त्यांच्याकडे पाहून बघा, उपजिल्हाधिकारी मॅडम स्वतः भाजीपाला घ्यायला आल्यात असे म्हणायच्या. त्यांच्याशी याबाबत विचारले असता नोकरी आणि घरची जबाबदारी प्रत्येकाने समतोल ठेवून सांभाळली पाहिजे. स्वतः भाजीपाला घ्यायला जाण्यात गैर काय? आपले काम आपणच केले पाहिजे, त्यासाठी नोकर कशाला? असे त्या सांगत.

Swati Thavil, Shubhangi Bharde
Women's Day Special : कॉलराने कसा घेतला होता मुलींच्या पहिल्या शाळेचा बळी ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com