.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Women League Judo Tournament : महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आणि जिल्हा ज्यूदो असोसिएशनतर्फे पंचवटीतील (स्व.) मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात पश्चिम विभागाच्या खेलो महिलांच्या ज्यूदो स्पर्धा रविवारी (ता. १) सुरू झाल्या. स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, गुजराथ, गोवा, मध्य प्रदेश आणि दीव- दमण, अशा सात राज्यांतील ८९४ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. पहिला दिवस छत्तीसगडाच्या खेळाडूंनी गाजविला. रविवारी केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. (Women League Judo Tournament Players of Chhattisgarh has great day )