Nashik News: विश्वविक्रम 70 हजार हृदयसंबंधी शस्‍त्रक्रियांचा! डॉ. चोपडा यांची ‘लंडन बुक ऑफ रेकॉर्डस्’‌मध्ये नोंद

Nashik News : वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांची ‘लंडन बुक ऑफ रेकॉर्डस्‌’मध्ये नोंद केली असून, या विश्‍वविक्रमाबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्‍मानित करण्यात आले आहे.
MLA Nitin Pawar, Mayor Kautik Pagar, Sudhakar Pagar, Bhavrao Pagar, Adv. Parshuram salary.
MLA Nitin Pawar, Mayor Kautik Pagar, Sudhakar Pagar, Bhavrao Pagar, Adv. Parshuram salary. esakal

नाशिक : शहरातील हृदयविकारतज्‍ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी आजपर्यंत केलेल्या ७० हजार शस्‍त्रक्रिया (इंटरव्‍हेशनल कार्डियाक प्रोसिजर) व वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांची ‘लंडन बुक ऑफ रेकॉर्डस्‌’मध्ये नोंद केली असून, या विश्‍वविक्रमाबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्‍मानित करण्यात आले आहे. (Nashik World record of cardiac surgeries magnum hospital marathi news)

डॉ. मनोज चोपडा यांनी २८ वर्षांत ७० हजारांहून अधिक शस्‍त्रक्रिया केल्या आहेत. तसेच एक लाखापेक्षा जास्‍त शाळकरी विद्यार्थ्यांचे इको कार्डिओग्राम स्‍क्रीनिंग केले आहे. यापूर्वी अवघ्या २० तासांत ३९ शस्‍त्रक्रिया, वैद्यकीय प्रक्रिया राबविताना त्‍यांनी राष्ट्रीय स्‍तरावर विक्रम नोंदविला आहे.

नवजात शिशूंपासून ते आठ वर्षांपर्यंतच्‍या अशा एकूण १४ बालकांच्‍या हृदयाचे छिद्र बंद करण्याची शस्‍त्रक्रिया अवघ्या १२ तासांमध्ये त्यांनी केली आहे. आजपर्यंत ७५ क्‍लिनिकल ट्रायल्समध्ये सहभागी होतांना त्‍यांनी संशोधनाला प्रोत्‍साहन दिले आहे. यासोबत २० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये त्‍यांचे शोधप्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. (Latest Marathi News)

MLA Nitin Pawar, Mayor Kautik Pagar, Sudhakar Pagar, Bhavrao Pagar, Adv. Parshuram salary.
Yashasvi Jaiswal : जैस्वालचा अजून एक मोठा विक्रम! राहुल द्रविडला मागं टाकत पोहचला विराट कोहलीच्या जवळ

वणीसारख्या आदिवासीबहुल गावात जन्‍मलेल्‍या डॉ. चोपडा यांनी ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्‍णांना आरोग्‍याच्या सुविधा मिळाव्यात म्हणून शहरात हॉस्‍पिटल सुरू केले. आजपर्यंत त्‍यांनी रोबोटिक अँजिओप्लास्टी, आयव्‍हीयूएस, ओसीटी इमेजिंग, बायो ॲसार्जेबल स्‍टेंट्‌स यांसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्राला अवगत करून दिले आहे.

MLA Nitin Pawar, Mayor Kautik Pagar, Sudhakar Pagar, Bhavrao Pagar, Adv. Parshuram salary.
Nashik News : योजना लाभार्थ्यांनी दर्जेदार घरे बांधावीत : पालकमंत्री दादा भुसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com