Youths participating in the procession held on the occasion of World Tribal Day.esakal
नाशिक
World Tribal Day 2024 : सरकार पळवतेय आदिवासींचा निधी : बाळासाहेब थोरात
Nashik News : जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुक्रवारी (ता. ९) अखिल भारतीय विकास परिषदेतर्फे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
World Tribal Day 2024 : राज्य सरकारने ९.३५ टक्के आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद करणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक वर्षांपासून आदिवासींच्या योजनांसाठी त्या प्रमाणात निधी मिळत नाही. आताच्या सरकारने आदिवासी बांधवांच्या उन्नतीसाठी अर्थसंकल्पात ठेवलेल्या राखीव निधीची पळवापळवी केली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. महाविकास आघाडी सरकार असतानाही सध्याच्या अर्थमंत्र्यांकडून हा प्रकार होत असल्याने आदिवासी विभागाच्या निधीसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. (Balasaheb Thorat allegations Govt wasting tribal funds)

