.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जुने नाशिक : ईद- ए- मिलादनिमित्त काढण्यात येणारा जुलूस सोमवारी (ता. १६) काढण्यात येणार आहे. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात दुपारी २ वाजता चौक मंडई येथून जुलूसला प्रारंभ होणार आहे. डीजेमुक्त जुलूस असणार आहे, अशी माहिती खतीब यांनी शाही मशीद येथे आयोजित बैठकीत दिली. मुस्लिम बांधवांकडून सोमवारी हजरत महम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलाद साजरी केली जाणार आहे. (year DJ free procession on occasion of Eid Milad was decided in meeting held at Shahi Masjid )