Yeola Constituency : भाजपच्या वर्चस्वाला 15 वर्षांनंतर लागला सुरुंग! येवल्यात 2009 नंतर प्रथमच लोकसभेला राष्ट्रवादीला मताधिक्य

Lok Sabha Election 2024 Result : लोकसभेला याच भाजपने मागील दोन्ही निवडणुकीत विक्रमी मताधिक्य घेतले आहे. या वेळी मात्र २००९ नंतर भाजपच्या मताधिक्याला सुरंग लावण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला यश आले आहे.
Bharti Pawar and Bhaskar Bhagre
Bharti Pawar and Bhaskar Bhagreesakal

Yeola Constituency : राजकारणात कधी कोणता बालेकिल्ला ढासळेल, हे सांगता येत नाही. तसे तर येवला भाजपचा बालेकिल्ला कधीच नाही; मात्र लोकसभेला याच भाजपने मागील दोन्ही निवडणुकीत विक्रमी मताधिक्य घेतले आहे. या वेळी मात्र २००९ नंतर भाजपच्या मताधिक्याला सुरंग लावण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला यश आले आहे. किंबहुना तत्पूर्वी व आत्ताही भाजपची मते दखल घेण्यासारखीच आहे. (Nashik Yeola Assembly constituency After 15 years of BJP supremacy demolished by NCP)

येवला मतदारसंघ पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मध्यतरी दहा वर्ष शिवसेनेनेदेखील येथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. २००४ मध्ये येथे राज्याचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांनी अनपेक्षितपणे उमेदवारी केली आणि तेव्हापासून हा भुजबळांचा अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला झाला आहे.

विधानसभेसह नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती आदी सर्वच संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे वेळोवेळी वर्चस्व राहिले आहे. भाजपला नगर पालिकेत यश मिळत असले तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीत मात्र खाते खोलनेही अवघड झाले असल्याची परिस्थिती आहे.

तसे तर येवला हे पारंपरिक संघाचे गाव असून, भाजपला मानणारा मोठा वर्ग आजही आहे. त्यातुलनेत केंद्र व राज्य सरकारमध्ये सत्तेत येऊन दहा वर्ष उलटले तरी ग्रामीण भागात म्हणावे असे संघटन उभे नसल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालातून दिसते.

ही सर्व परिस्थिती असली तरी लोकसभेला मात्र येथील जनता नेहमीच भाजपसोबत राहिल्याचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून दिसत आहे. दिंडोरी मतदारसंघ राखीव असल्याने येथे आदिवासी उमेदवार रिंगणात असतो. त्यामुळे उमेदवार पक्ष आणि स्थानिक नेतृत्वाकडे पाहून देखील येथील मतदार भाजपकडे झुकल्याचे दिसतात.

२००९ मध्ये सर्वप्रथम भाजपकडून या मतदारसंघात हरिश्चंद्र चव्हाण उमेदवार होते. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवळ उभे होते. मात्र तालुक्याच्या संबंधाच्या जोरावर चव्हाणांनी चांगली मते मिळविल्याने राष्ट्रवादीला केवळ ५,८१४ मतांचे मताधिक्य मिळाले होते. (latest marathi news)

Bharti Pawar and Bhaskar Bhagre
Dhule Lok Sabha Election 2024 Result : मालेगाव बाह्यमध्ये भामरेंना मताधिक्क्य, डॉ. बच्छावांचीही पाठराखण!

त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत चव्हाण यांना लाखावर मते मिळून तब्बल ५३ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. पुन्हा २०१९ मध्येही भारती पवार यांना येथून २८ हजार मतांचे मताधिक्य दिले होते. अर्थात त्या वेळी स्थानिक नेत्यांसह शिवसेनेची ताकदही भाजपसोबत प्रत्येक वेळेस होती.

डॉ. पवार यांच्या मागील पाच वर्षांच्या कामगिरीवर समाधान न झाल्याने आता प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी पक्षाचे भास्कर भगरे यांना १३ हजार २२५ मतांचे मताधिक्य येवलेकरांनी दिले आहे. अर्थात नाराजीच्या चर्चा सुरू असल्या तरी डॉ. पवार यांना तब्बल ८० हजार मते मिळाली, हेही दुर्लक्ष करून चालणार नाही. या वेळी नेत्यांसह शिवसेना सोबत नसतानाही भाजपचे मते वाढले असल्याने लोकसभेला तरी भाजपला दुर्लक्ष करून चालणार नाही, हे नक्की.

अशी आहे मतांची तफावत

वर्ष - भाजप - राष्ट्रवादी - मताधिक्य

२००९ - ४७,३५१- ५३,१६५ - ५८१४ (राष्ट्रवादी)

२०१४ - १,०२,९०२ - ४९,८८९ - ५३,०१३ (भाजप)

२०१९ - ९५,७०९ - ६७,५८९ - २८,१२० (भाजप)

२०२४ - ८०,२९५ - ९३,५०० - १३,२०५ (राष्ट्रवादी)

Bharti Pawar and Bhaskar Bhagre
Dhule Lok Sabha Election 2024 Result : बागलाण विधानसभेतील कांदाप्रश्नाची धग, अडंरकरंट न जाणणे ठरले घातक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com