Pomegranate esakal
नाशिक
Nashik Pomegranate : भाक्षीतील युवा शेतकऱ्याने 30 गुंठे डाळिंब बागेतून 6 टनाचे उत्पादन
Pomegranate : भाक्षी (ता. बागलाण) येथील युवा शेतकरी जगन्नाथ रौंदळ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अपयशी येत असल्याने वडिलोपार्जित शेतीत डाळिंब बागेत नशीब शोधले. 
Nashik Pomegranate : भाक्षी (ता. बागलाण) येथील युवा शेतकरी जगन्नाथ रौंदळ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अपयशी येत असल्याने वडिलोपार्जित शेतीत डाळिंब बागेत नशीब शोधले. विहीर खोदली, बोरवेल केला त्याला पाणी लागले नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता ३० गुंठ्यातील डाळिंबाला सलग दोन वर्षे टँकरने पाणी टाकून बाग फुलवली. अखेर कष्टाला नशिबाने साथ दिली. ३० गुंठ्यात डाळिंब बागेची यशस्वी लागवड सहा टन फळांची किमया घडविली. (young farmer in Bhakshi produced 6 tonnes from 30 bunch pomegranate orchard)

