Nashik PM Narendra Modi : मोदींच्या सभेत कांदा शेतकर्याची मुस्कटदाबी! लासलगावात आंदोलन

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत येथील सभेमध्ये तरुण शेतकर्याने कांदाप्रश्नी घोषणाबाजी करीत लक्ष वेधून घेतले.
Police deployment during the meeting at Pimpalgaon
Police deployment during the meeting at Pimpalgaonesakal

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत येथील सभेमध्ये तरुण शेतकर्याने कांदाप्रश्नी घोषणाबाजी करीत लक्ष वेधून घेतले. तर, लासलगाव येथे उत्पादन उत्पादक शेतकर्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलन करीत मोदी यांच्या निर्यातबंदी विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. दरम्यान, सभेच्या पूर्वसंध्येला उशिराने का होईना, ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील कांदा संघटना व शेतकर्यांना नोटीसा बजावत कारवाईचे सोपस्कार पार पाडले. (young farmer raised slogans on onion issue)

पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आढावा बैठक घेतली असता, त्यावेळीच कांदा प्रश्नावरून सभा नाशिक शहरात घेण्याबाबत सूचविण्यात आले होते. तसेच, ग्रामीण पोलिसांमधील असमन्वयही दिसून आला होता. ग्रामीण पोलिसांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले. मात्र, कांदा प्रश्नांमुळे आंदोलनाची धास्ती पोलिसांनी घेतली होती.

यासंदर्भात शहर पोलिसांनीही शहर-जिल्ह्यातील कांदा आंदोलकांना नोटीसा बजावून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत सूचना केली होती. परंतु ग्रामीण पोलिसांनी सभेच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (ता.१४) कांदा आंदोलकांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजाविल्या.

मात्र, त्यानंतरही लासलगाव येथे कांदा आंदोलक जयदत्त होळकरांसह कांदा उत्पादक शेतकर्यांनी गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून मोदी यांच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा निषेध करीत घोषणाबाजी केली. तर, मोदी यांच्या सभेमध्ये तरुण कांदा शेतकर्याने कांदाप्रश्नी घोषणाबाजी केली. यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. (latest marathi news)

Police deployment during the meeting at Pimpalgaon
Nashik Eknath shinde Road Show : मुख्यमंत्र्यांचा गंगापूर रोडवर आज रोड शो! नाशिक शहर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

ग्रामीण पोलिसांचा असमन्वय

सभेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीसांच्या बंदोबस्तासंदर्भातील नियोजन हे असमन्वयामुळे चर्चेत राहिले. सोमवारीच (ता.१३) बंदोबस्तावरील पोलिसांना बंदोबस्ताचे नियोजन देणे अपेक्षित असताना, पोलीस अधीक्षकांकडून मंगळवारी (ता.१४) सायंकाळी उशिराने बंदोबस्त मिळाला. तसेच, वेळीच आंदोलकांना नोटीसा बजावून कारवाई करणे आवश्यक असतानाही पोलिसांकडून उशिराने नोटीसा बजावल्या गेल्या. एकूणच, ग्रामीण पोलिस अधिकार्यांमधील असमन्वयाचा मनस्ताप बंदोबस्तातील पोलिसांना सहन करावा लागल्याची चर्चा होती.

चिल्लरही केली जमा

कांदाप्रश्नावरून ग्रामीण पोलीसांनी धास्ती घेतलेली होती. त्यामुळे सभेसाठी येणार्यांची एकदा नव्हे तर तीनवेळा तपासणी केली जात होती. सभेसाठी येणारे ग्रामीण भागातील नागरिक असल्याने त्यांच्या खिशातील सुट्टे पैसेही पोलिसांकडून काढून घेतले जात होते. याबाबत सभेसाठी येणार्या नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला.

Police deployment during the meeting at Pimpalgaon
Nashik Educational News : जिल्ह्यातील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके; समग्र शिक्षा अभियान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com