
नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव येथील तरुण शेतकरी योगेश राजेंद्र खुळे याने आपल्या शेतीच्या संकटाला तोंड देण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला आहे. शेतात पाणी साचल्याने पेरणी अशक्य झाल्यामुळे त्याने सोयाबीनच्या बियाण्यांची विक्री केली आणि त्यातून मिळालेले ५,५५० रुपये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मनी ऑडरद्वारे पाठवले. यासोबतच, त्याने मंत्र्यांना पत्र लिहून एक विनंती केली आहे, "माझ्यासाठी रमीचा एक डाव खेळा, तो जिंका आणि मला पैसे पाठवा!"