नागचौकात युवकावर प्राणघातक हल्ला

नागचौकात युवकावर प्राणघातक हल्ला
Published on: 
युवकावर प्राणघातक हल्ला हवेत शस्त्र फिरवून संशयितांची भाईगिरी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १८ : तू एवढ्या रात्री माझ्या घराजवळ काय करत आहेस, असा सवाल विचारल्याचा राग आल्याने चौघांच्या टोळक्याने युवकाला व त्याच्या मित्राला दांडके, फळी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना नागचौकात घडली. तसेच, "मी या परिसराचा भाई आहे, एका-एकाचा मुडदा पाडतो, अशी भीती दाखवत संशयितांनी हवेत शस्त्रे फिरवून परिसरात दहशत माजवली. नागरिकांनी भीतीपोटी आपापल्या घरांचे दरवाजे बंद करून घेतले. ही घटना जोशीवाडा, नाग चौक येथे शुक्रवारी (ता. १६) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. दुग्ध व्यावसायिक सागर अशोक गरड (३५) यांच्या फिर्यादीनुसार, सागर हे त्यांच्या घराजवळ थांबलेल्या एका संशयितास विचारणा केली असता, संशयित किशोर वाकोडे, गणेश व त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांनी गरड व त्यांचा मित्र विकी बर्गे यांना शिवीगाळ करत दांडके, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली. नागरिक जमा झाले असता, त्यावेळी वाकोडे याने धारदार शस्त्र काढून हवेत फिरवत आरडाओरड केली व पाठलाग करून दहशत निर्माण केली. तसेच, मी या परिसराचा भाई असून, एकेकाचा मुडदा पाडीन अशी धमकी दिली. त्यामुळे लोकांनी आपआपल्या घरात जात दरवाजे बंद केले. तर, गरड यांना पोलिसांत तक्रार केल्यास धमकी देऊन संशयित पसार झाले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार पाटील अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com