रिक्षा अडवून तरुणांस मारहाण करत चार हजारांची लूट

रिक्षा अडवून तरुणांस मारहाण करत चार हजारांची लूट
Published on: 
तरुणांस मारहाण करत चार हजारांची लूट जुने नाशिक, ता. ४ : नाशिक रोड रेल्वेस्थानकावरून रिक्षाने कॅनडा कॉर्नरकडे जात असलेल्या तरुण-तरुणींची रिक्षा अडवून लूट करण्याचा प्रकार शिवाजी रोड परिसरात घडला. शालीमार ते सीबीएस सिग्नलदरम्यान रिक्षाचा पाठलाग करत असलेल्या चारचाकीने सीबीएस, शिवाजी रोड येथे रिक्षा अडवली. संशयित दोघांनी त्यांना मारहाण करत चार हजाराची रक्कम लुटली. शनिवारी (ता.३) पहाटे ही घटना घडली. राज पाटील यांनी याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पहाटे राज पाटील मित्रांसह रिक्षाने कॅनडा कॉर्नरकडे जात होते. शालीमार येथे आल्यानंतर पांढऱ्या रंगाची चारचाकी (एमएच- ४३- वाय- ७५६२) ने त्यांच्या रिक्षाचा पाठलाग सुरू केला. चारचाकीमधील दोघांनी रिक्षाचालकाला शिवीगाळ करून रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, चालकाने रिक्षा वेगाने पुढे नेली. त्यानंतर चालकाने सीबीएस सिग्नलच्या आधी रिक्षेला आडवी चारचाकी लावून अडविले. त्यातून उतरलेल्या दोघांनी रिक्षाचालकाला मारहाण केली. त्यातील काळा शर्ट घातलेल्या इसमाने राज पाटील यांना मारहाण करून त्यानंतर वेदांत चौधरी यालाही मारहाण केली. संशयिताने फायटरचा धाक दाखवत सर्वांकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास सर्वांना मारून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले. त्यानंतर राज यांच्या खिशातून तीन हजार रुपये काढून घेतले. आणखी पैसे मागितल्यानंतर रिक्षातील तरुणीने फोन-पेवरून संशयिताने दिलेल्या क्रमांकावर एक हजार रुपये पाठविले. पोलिसांत तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन दोघे तेथून निघून गेले. याप्रकरणी दोन अनोळखी इसमांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com