
सातपूर : चिचोंडी औद्योगिक परिसरात ६ जुलै २०२२ ला अफगाणिस्तानातील नागरिक असलेल्या जरीफबाबा या तरुणाची गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडली होती. बाबाच्या सहकाऱ्याच्या नावावर अनेक मालमत्ता घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. त्यातील काही मालमत्ता औद्योगिक वसाहतीमध्येही होती. या घटनेला दोन वर्षे होत नाहीत तोच काही तथाकथित बिल्डर तसेच दलाल आता या मालमत्ता बळकावण्यासाठी उद्योग खात्यासह मंत्रालय स्तरावर खेटा घालत असल्याचे दलालांमध्ये बोलले जात आहे.