नाशिक : जावयाकडून सासूचा भोसकून खून

झारवड जोशीवाडी येथील घटना : पत्नी येत नसल्याने भांडण सोडविताना केले कात्रीने वार
Nashik Zarwad Joshi Wadi incident Mother in law murder by Scissor attack
Nashik Zarwad Joshi Wadi incident Mother in law murder by Scissor attacksakal

इगतपुरी : पतीच्या व्यसनाल कंटाळून माहेरी आलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीने पत्नी येण्यास टाळाटाळ करत असल्याने संतापाच्या भरात पत्नी आणि अल्पवयीन मुलीला विळ्याने मारहाण करायला सुरवात केली. त्यांनी सोडविण्यास गेलेल्या सासूला जावयाने कात्रीने भोसकले. वार वर्मी बसल्याने सासूचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पत्नी आणि मुलीने आरडाओरड केल्याने आजबूबाजूच्या लोकांनी जावयाला पकडून ठेवत पोलिसांना घटन कळविली. पोलिसांनी जावयाला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्‍वर तालुक्याच्या सरहद्दीवरील झारवड जोशीवाडी येथे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. मृत सासूचे नाव कमळाबाई सोमा भुतांबरे (५५, रा. जोशीवाडी, झारवड,ता. त्र्यंबकेश्वर) असे आहे. विवाहित मुलीचे नाव सौ. इंदूबाई किसन पारधी (३६, रा. कळमुस्ते, जांभूळवाडी, ता.त्र्यंबकेश्‍वर) असून तिला बारा वर्षीय मुलगी माधुरी असे आहे. पतीच्या व्यसनाला कंटाळून माधुरीली घेऊन इंदूबाई काही दिवसापूर्वी माहेरी झारवड येथे आली. पतीचे व्यसन आणि सततच्या कटकटीमुळे ती सासरी जाण्यास तयार नव्हती.

त्यामुळे तिला घेण्यासाठी पती किसन महादू पारधी (४२, रा. कळमुस्ते) हा आज सकाळी सासरी आला होता. तो पत्नीला घरी येण्याबाबत आग्रह करू लागला. याच दरम्यान पत्नी स्वयंपाक करत असताना, नवरा बायकोमध्ये भांडण झाले. यात किसनने पत्नी इंदुबाई हिला मारहाण करायला सुरवात केली. या दरम्यान सासू कमळाबाई व मुलगी माधुरी भांडण सोडविण्यास आल्या असता किसन पारधी याने कमळाबाई यांच्या पोटात व पाठिवर कात्रीने भोसकले, अति रक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेबाबत आरडाओरड होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन संशयित किसन महादू पारधी यास जागीच पकडून ठेवले व घोटी पोलिसांना माहिती दिली. जखमी अवस्थेत पडलेल्या इंदूबाई व माधुरी यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे, उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फडतरे, घोटीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची व परिस्थितीची माहिती घेत तपासाच्या सूचना दिल्या.

घोटी पोलिसांनी बाळा निवृत्ती भुतांबरे (२७) यांच्या फिर्यादीवरून किसन महादू पारधी याच्याविरुद्ध खून, जिवे मारण्याचा प्रयत्न आदी कलमाखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती श्रद्धा गंधास यांच्यासह हवालदार कोरडे, शीतल गायकवाड, रवी जगताप, गोविंद सदगीर आदी तपास करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com