नाशिक- गेल्या काही वर्षात शहरात अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः शालेय-महाविद्यालयीन मुलांना अमली पदार्थांचा विळखा बसला असून, त्यामुळे शहराच्या गुन्हेगारीत वाढ होते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविण्याचे जाहीर केले असून या धोरणाचा प्रारंभ नाशिकपासून करावा अशी मागणी आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी केली.