Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या निर्मलवारी प्रस्तावाचा घोळ सुरूच; संत निवृत्तिनाथ महाराज विश्वस्तांची धरसोडवृत्ती

Nashik ZP : जिल्हा परिषदेकडून संत निवृत्तिनाथ पालखी सोहळा निर्मलवारी प्रस्तावाच घोळ सुरूच आहे.
Nashik ZP News
Nashik ZP News esakal

Nashik ZP News : जिल्हा परिषदेकडून संत निवृत्तिनाथ पालखी सोहळा निर्मलवारी प्रस्तावाच घोळ सुरूच आहे. संत निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिराच्या विश्वस्तांकडून वारीबाबत असलेल्या मागण्यांबाबत धरसोड वृत्तीमुळे प्रस्तावात बदल करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने ६.५० कोटी रुपयांच्या तयार केलेल्या विकास आराखड्यात पुन्हा बदल करून नव्याने ५.६८ कोटींचा प्रस्ताव तयार केला असून, हा प्रस्ताव शासनाला सादर केला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. (continues to stir up Sant Nivruttinath Palkhi Sohala Nirmalwadi proposal )

दरम्यान, प्रस्तावातील या घोळामुळे वारी नियोजनास उशीर होण्याची शक्यता आहे. संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकोबाराय यांच्या पालखीप्रमाणेच संत सोपानदेव, संत निवृत्तिनाथ व संत मुक्ताई यांच्या पालखीतील वारकऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी निर्मलवारीकरिता २० कोटी रुपये निधी देण्याची घोषणा २०२३ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

त्यानुसार ग्रामविकास मंत्रालयाने या घोषणेप्रमाणे निधी देण्यासाठी जुलैमध्ये नाशिक व जळगाव या जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन या निर्मलवारीचे प्रस्ताव मागविले होते. मात्र, सहा महिने उलटूनही या पत्राची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर, ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषद प्रशासनाला पुन्हा स्मरणपत्र पाठविले.

या स्मरणपत्राची तातडीने दखल घेत मित्तल यांनी ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्यावर प्रस्ताव पाठविण्याची जबाबदारी सोपविली. त्यांनी दिंडीशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून निर्मलवारीचा ६.५० कोटींचा प्रस्ताव तयार करून मित्तल यांना सोपविला. त्यांनी गत आठवड्यात तो प्रस्ताव मंत्रालयात पाठविला असल्याचेही प्रशासनाने सांगितले होते. (latest marathi news)

Nashik ZP News
Nashik ZP News : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना यंदा ‘ब्रेक’

मात्र, या प्रस्तावात मंदिराच्या विश्वस्तांकडून अनेक बदल सुचविण्यात आले. त्यासाठी मंदिराच्या विश्वस्तांनी मित्तल यांच्या भेटी घेत वेगवेगळे बदल सुचविले. सुरवातीस मागणी केलेल्या प्रस्तावांना विरोध दर्शवत, नवीन मागण्या करण्यात आल्या. यातही विश्वस्तांमध्ये एकमत दिसून आले नाही. त्यामुळे मागण्यांच्या घोळामुळे प्रस्तावात पुन्हा बदल करण्यात आला. सुरवातीस वारीचे नियोजन जिल्ह्यापुरते केवळ सात दिवसांसाठी केले होते.

परंतु, आता ते पंढरपूरपर्यंत म्हणजे २५ दिवसांसाठी करण्यात आले आहे. फिरत्या शौचालयाची संख्या वाढविण्यात आली. बदल केलेला पाच कोटी ६८ लाख ६५ हजार रुपयांचा नवा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. या प्रस्तावास मंजुरी कधी मिळणार, त्यानंतर उपाययोजना कधी करायच्या असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

असा आहे आराखडा

जिल्हा परिषदेने तयार केलेल्या ५.६८ कोटींच्या निर्मलवारीच्या प्रस्तावात वारीतील भाविकांना मुक्कामाच्या ठिकाणी जलप्रतिबंधक मंडपासाठी ७५ लाख, गोल मंडपासाठी १० लाख, साउंड सिस्टिम, जनित्र व दिव्यांची व्यवस्था १४ लाख, पाण्याचे टॅंकर नऊ लाख ३६ हजार, फिरती शौचालये दोन कोटी ६३ लाख, फिरते स्नानगृह एक कोटी एक लाख, रुग्णवाहिका ३५ लाख, सीसीटीव्ही दोन कोटी ८० लाख, पशुधन खर्च ४७ लाख, पालखी सोहळ्यातील भाविकांना सुविधा देण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींना १३ लाख रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव आहे.

Nashik ZP News
Nashik ZP News : ग्रामसेवक युनियन असहकार आंदोलनावर ठाम; आंदोलनाबाबत संघटनांमध्ये फूट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com