नाशिक- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदलीत अंशत: बदल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज भरून घेतले जात आहेत. पात्र कर्मचाऱ्यांनी रविवारी (ता. ८) सायंकाळी सहापर्यंत हे अर्ज सादर केले. विभागप्रमुख या अर्जांची पडताळणी करून सोमवारी (ता. ९) आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे सादर करणार आहेत.