नाशिक- जिल्हा परिषदेतील प्रकरणामुळे राज्यभरात नाशिकचे नाव खराब होत आहे. तक्रारींबाबत गोपनीय पद्धतीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा; पण जिल्ह्याची होणारी बदनामी थांबवा. यासाठी जिल्ह्यातील मंत्र्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेच्या कामकाजात लक्ष घालण्याचे आवाहन माजी महिला अध्यक्षांनी केले आहे.