Nashik Zilla Parishad
Sakal
किरण कवडे,नाशिक: मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेत २००२ पासून फिरत्या चक्राकार पद्धतीचे आरक्षण लागू झाल्यानंतरही सर्वसाधारण गटातील अध्यक्षच येथील कारभारी राहिले आहेत. गेल्या २० वर्षांच्या कार्यकाळात सर्वसाधारण (खुल्या) गटातून सहा, इतर मागास प्रवर्गाचे (ओबीसी) तीन, अनुसूचित जातीचे (एससी) दोन, तर अनुसूचित जमातीला (एसटी) एक वेळा अध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे मिनी मंत्रालयात सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्यांचा सर्वाधिक काळ बोलबाला राहिल्याचे यातून स्पष्ट होते.