नाशिक: जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने मेमध्ये केलेल्या बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाने अहवाल मागविला आहे. याविषयीचे पत्र विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. त्यामुळे बदली प्रक्रिया पुन्हा वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली. राज्य जिल्हा परिषद महासंघाने ग्रामविकास विभागाकडे तक्रार केली आहे.