
मालेगाव शहर : मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाळेत शिक्षणाबरोबरच खेळही शिकवले जातात. मात्र, जिल्ह्यातील ३८० शाळांमध्ये खेळण्यासाठी स्वतःची मैदानच उपलब्ध नसल्याने खेळ व क्रीडा विकास कसा साधला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या तीन हजार २६४ शाळा आहेत. दोन हजार ६५४ शाळांच्या आवारात क्रीडांगणांसाठी मुबलक जागा उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी मैदान नसल्याने स्थानिक पातळीवर पर्यायी व्यवस्था करून मोकळ्या जागेवर शिक्षक खेळाची तयारी करून घेतात.