रस्त्याच्या कामाच्या बिलावर २ टक्के मागणी, लाच घेताना ZP इंजिनिअरसह ३ अधिकाऱ्यांना अटक

Nashik News साडेचार लाखांचे बिल अदा करण्यासाठी अभियंता दराडे याने दोन टक्क्यांप्रमाणे नऊ हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे सांगितले. त्यानंतरच मोजमाप पुस्तिकेवर सही करणार असल्याचे सांगितले.
Bribe Crime
Bribe Crimeesakal
Updated on

नाशिक, ता. २७ : पिंपळगाव मोर येथील रस्त्याच्या कामाच्या बिलावर दोन टक्क्यांची लाचेची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या इगतपुरी उपविभागातील सहायक व स्थापत्य अभियंत्यासह कनिष्ठ सहायकाला अटक करण्यात आली. लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. २७) ही कारवाई केली असून, या प्रकरणी इगतपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com