Nashik ZP News : ग्रामपंचायतींकडील 318 कोटींचा निधी अखर्चित! जिल्ह्यात 15 व्या वित्त आयोग निधी आढाव्यात बाब समोर

Nashik News : केंद्र सरकारकडून १६ व्या वित्त आयोगासाठी माहिती संकलन करण्याचे काम सुरू केलेले असतानादेखील नाशिक जिल्ह्यात १५ व्या वित्त आयोगाचा निधी अखर्चित असल्याचे चित्र आहे.
Fund of 318 crore from gram panchayats unspent
Fund of 318 crore from gram panchayats unspentesakal
Updated on

Nashik News : केंद्र सरकारकडून १६ व्या वित्त आयोगासाठी माहिती संकलन करण्याचे काम सुरू केलेले असतानादेखील नाशिक जिल्ह्यात १५ व्या वित्त आयोगाचा निधी अखर्चित असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना एप्रिल २०२० ते मार्च २०२४ या चार वर्षांच्या काळात १५ वा वित्त आयोगातून ८५९ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. (Fund of 318 crore from gram panchayats unspent)

यातील केवळ ५४१ कोटी रुपये (६३ टक्के) निधी खर्च झाला असून, तब्बल ३१८ कोटींचा निधी खर्चाविना पडून आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतून ही माहिती समोर आली आहे. १५ व्या वित्त आयोगाचा निधी वितरणात जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या एकूण निधीच्या ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यात व उर्वरित प्रत्येकी दहा टक्के निधी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना दिला गेला आहे.

या निधी खर्चासाठी त्यांनी बंधित व अबंधित, असे निकष घालून दिले. त्यात प्राप्त झालेल्या निधीच्या ६० टक्के रक्कम बंधितसाठी व ४० टक्के निधी अबंधितमधील कामांसाठी खर्च करावा, असे बंधन टाकले आहे. त्यात मूलभूत सुविधांची कामे अबंधित निधीतून व पाणीपुरवठा व स्वच्छतेसंबंधी कामे बंधित निधीतून करता येतात.

या निधी खर्चासाठी सरकारने ग्रामपंचाती, पंचायत समिती व जिल्हा परिषद या तीनही स्तरावर विकास आराखडे तयार केले गेले आहे. केंद्र सरकारने गत वर्षात दिलेल्या निधीच्या ५० टक्के निधी खर्च झाल्याशिवाय पुढील वर्षीचा निधी दिला जाणार नसल्याची भूमिका घेतली होती. यामुळे ग्रामपंचातींकडून हा निधी वेळेवर खर्च होत नसल्यामुळे जिल्ह्याला पहिल्या वर्षी बंधित व अबंधित मिळून केवळ ३२५ कोटी रुपये निधी मिळाला होता. (latest marathi news)

Fund of 318 crore from gram panchayats unspent
Nashik ZP News : परस्पर सुट्टी घेणाऱ्या उपशिक्षणाधिकाऱ्यास नोटीस

तो निधी, तसेच त्यानंतरचाही निधी ग्रामपंचायतींकडून वेळेवर खर्च झाला नाही. या मुळे दर वर्षी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत कपात होत गेली. गत वर्षी म्हणजे २०२३-२४ या आर्थिक वर्षात केवळ १६३ कोटी रुपये म्हणजे पहिल्य वर्षाच्या ५० टक्केच निधी प्राप्त झाला आहे. यामुळे निधी खर्चात ग्रामपंचायतस्तरावरील उदासीनता दिसून येत आहे.

तालुकानिहाय झालेला खर्च

येवला (५५.०४ टक्के), चांदवड (५६.०६), देवळा (५६.०९), त्र्यंबकेश्वर (५७.०१), बागलाण (५८.०९), सुरगाणा (६०.०५), पेठ (६१.०४), नांदगाव (६३.०२), मालेगाव (६४), दिंडोरी (६५.०२), नाशिक (६५.०३), इगतपुरी (६६.०६), कळवण (६७.०१), सिन्नर (६८.०१), निफाड (६८.०८ टक्के).

Fund of 318 crore from gram panchayats unspent
Nashik Lok Sabha Constituency : स्थानिक मुद्यांवर रोष कायम; मताधिक्याबाबत उत्सुकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com